अनुष्काआणि विराटच्या मिठीत सामावले सारे क्रिकेट स्टेडियम .

Kolhapur news
By -

          


     कोल्हापूर न्यूज  /  वि. रा.भोसले



  आर सी बी ने क्रिकेटची टाटा आय पी एल ट्रॉफी जिंकली आणि कोट्यवधी क्रिकेट रसिकांचा विराट कोहली वरील प्रेमाचा बांध फुटला.तिकडे अहमदाबादच्या स्टेडियम वर धावत येऊनल अनुष्काने विराट ला मिठी मारली.त्या मिठीत जणू आख्खे क्रिकेट स्टेडियम सामावले.

     ते अद्भुत दृश्य स्टेडिमच्याच नव्हे तर जगातल्या कोट्यवधी क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे  होते.रसिकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावून टाकणारे होते.


    क्रिकेट रसिक या जोडीला प्रेमाने विरुष्कl असे म्हणतात.ही जोडी म्हणजे क्रिकेट आणि बॉलिवूड यांच्या विहंगम संगमाचे  प्रतिक वाटावे.

    बॉलिवूडच्या माया नगरीत अनुष्काने स्वतःला पवित्र ठेवले आहे.एका लष्करी अधिकाऱ्याची ती मुलगी असल्याने तिच्याबद्दल वेगळा अभिमानही वाटतो.रश्मिका मानधना सारख्या कितीतरी गुणी अभिनेत्रींचा बॉलीवूडने बाजार मांडलेला असतांनाच अनुष्का त्यातून अलिप्त राहिली आणि क्रिकेट विश्वाशी एकरूप झाली.विराट तर क्रिकेट किंग म्हणून ओळखला जातो.


     आयपीएल च्या मैदानात या राजाराणी ची  ती भेट रसिकांचे मन मोहून टाकणारी होती.ती एक पर्वणीच ठरावी.

    १८ व्या सिझन मध्ये पहिल्यांदाच आर सी बी ला ट्रॉफी मिळाल्याचा आनंद शेवटच्या ओव्हर मध्ये विराटच्या चेहेऱ्यावर एका वेगळ्याच रूपात पहायला मिळाला.त्याचे डोळे पाणावले होते .चेहरा अक्षरशः अश्रूंनी भिजला होता. तो विजय त्याच्या रोमा रोमा तून वहात होता.ज्या मैदानावर मुठी आवळून एखाद्या छाव्या प्रमाणे तो आरोळी ठोकायचा त्या मैदानाची माती सुद्धा त्याला भेटायला आतुर झाली होती. भाऊक झालेल्या विराटने खाली वाकून तिलाही कवेत घेतले.

    विराट आणि अनुष्काच्या त्या गोड मिठीने आयपीएलच्या या विजयाला चार चांद लागले.एवढेच नव्हे तर विजयश्री सुद्धा हातात माळ घेऊन थोडा वेळ बाजूला थांबली.

    मैदानावर विराटचे सगळे कुटुंब उपस्थित होते.ते दृश्य सुद्धा मनोहारी होते.त्यातून सुद्धा एक कौटुंबिक संस्कार प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

     

       गर्भ श्रीमंतांची  अनेक जोडपी बाळांना एखाद्या हाय फाय पाळणा घरात ठेऊन फॉरेन ट्रिप ला निघून जातात.मौज मजा करतात.

     विराटचे कुटुंब त्याहून वेगळे वाटले.त्याची गोंडस कन्या सुद्धा मोठल्या डोळ्यांनी आई बाबांच्याकडे पहात होती.

  क्रिकेट कशाशी खातात हे तिला माहितीही नसावे.अद्भुत कांहीं तरी घडलंय एवढंच तिला जाणवत असावे.

    विराट बरोबरचा सलामीचा फलंदाज सॉल्ट सुद्धा हसतमुखाने शेजारी उभा होता. विराटने आपल्या या जिवलग मित्राच्या खांद्यावर हात टाकले.सॉल्ट म्हणजे मराठीत मीठ.मैत्रीचे मीठ सुद्धा प्रेमाची रुची वाढवते.

   

  विराट आणि अनुष्काची ती गोड मिठी क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वाला बरेच कांहीं शिकवून गेली.




                   -------------------