मुंबई : गोकुळ चे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ यांनी संचालक मंडळासह मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला सदिच्छा भेट दिली.
गेल्या वर्षी गोकुळने मंदिराला प्रसादासाठी साजूक तुपाचा पुरवठा केला होता. त्याच्या उत्कृष्ट गुणवत्तेचे कौतुक करत, यावर्षीही 280 मेट्रिक टन तुप पुरवठ्याचे टेंडर गोकुळला मिळाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना नविद मुश्रीफ म्हणाले, "गोकुळ दूध संघाची अशीच भरभराट व्हावी."
यावेळी गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील , संचालक अरुण डोंगळे, सर्व संचालक मंडळ, तसेच सिद्धिविनायक ट्रस्टचे सर्व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सिद्धिविनायक ट्रस्टच्या सचिव श्रीमती वीणा राजेश पाटील यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.
---------------------------