कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महावितरण ला २० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सप्ताह १जून ते ६ जून या कालावधीकरिता असेल.महावितरणचे दोन महत्वाचे संकल्प विद्युत ग्राहकांच्या पर्यंत व पर्यायाने जनसामान्यांपर्यंत पोचवणे हा या जनजागृती सप्ताहाचा उद्देश आहे.हे संकल्प असे.१ .शून्य अपघात महावितरण ,२ शून्य अपघात महाराष्ट्र .
या सप्ताहांतर्गत दिनांक २ जून रोजी सेनापती कापशी येथे व दिनांक ३ जून रोजी मुरगूड येथे सुरक्षा जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते.मुरगूड येथील हा कार्यक्रम नगरपरिषदे समोर शिवतीर्थ येथे संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी उपकार्यकारी श्री शरद कुमार संकपाळ सहायक अभियंता संतोष सरवळे कनिष्ठ अभियंता सुदेश जाधव विशाल पाटील सामाजिक कार्यकर्ता सर्जेराव भाट तसेच महावितरण शाखा कार्यालय लिंगनूर शाखा कारले सोनगे शाखा कार्यालय मुरगुड शहर व ग्रामीण मधील जनमित्र कर्मचारी व विद्युत ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------------