कोल्हापूर न्यूज नेटवर्क
जि. प. कोल्हापूर मध्ये विस्तार अधिकारी श्रेणी 3 वर्ग 3 , केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक प्राथमिक व मुख्याध्यापक माध्यमिक असे चार पदोन्नतीचे संवर्ग आहेत कोल्हापूर जिल्ह्यात चालू पदोनती वर्षामध्ये केंद्रप्रमुख पद (न्यायालयीन प्रकरण ) वगळता शंभर टक्के पदोन्नतीची पदे भरली आहेत .
यासाठी सामान्य प्रशासन विभागातील 2019 च्या शासन निर्णयातील तरतुदी प्रमाणे निवड यादीला मंजुरी घेऊन जसजशी सेवानिवृत्तीमुळे अथवा अन्य कारणांमुळे रिक्त पदे होतील तसतसे पदोन्नतीचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले. शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे कामकाज होण्यासाठी संपूर्ण प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे अशी ऐतिहासिक कामगिरी विभागाला करणे शक्य झाले आहे. यामध्ये सामान्य प्रशासन विभाग व पदोन्नती समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लोककल्याणाकारी भावनेने प्रशासनात सकारात्मक निर्णय घेण्याच्या स्वभावामुळे हे शक्य झाले असे शिक्षण विभागाने नमुद केले आहे .
एकाच वर्षात विस्तार अधिकारी पदोन्नती 8 वेळा देणारा कोल्हापूर हा राज्यात एकमेव जिल्हा आहे , तसेच पदोन्नतीचे लाभ देऊन शंभर टक्के पदे भरणारा देखील कोल्हापूर जिम्हा एकमेव असावा .पदोन्नती दिल्यामुळे प्रशासनाने सेवाविषयक लाभ देण्याचे कर्तव्य पुर्ण केले आहे , आता पदोन्नती धारकांनी किंबहुना शिक्षण विभागातील विविध घटकांनी गुणवत्तापूर्ण काम करून आपले कर्तव्य पार पाडावे अशी अपेक्षा आहेत.
विस्तार अधिकारी श्रेणी पदोन्नती..
पदोन्नती समिती मान्यता -10/10/2024
1) 10/10/2024= 11
2) 27/12/2024 = 3
3) 10/03/25 = 5
4) 29/04/2025 = 1
5) 26/06/2025 = 5
6) 30/06/2025 = 1
7) 28/07/2025 = 16
8) 29/08/2025 = 5
-----------------
एकूण 47
===================
केंद्र प्रमुख पदोन्नती
पदोन्नती समिती मान्यता दि.10/10/2024
1) दि.10/10/2024 = 68
==================
मुख्याध्यापक पदोन्नती
1) 12/06/2024 = 224
2) 14/08/2024= 24
पदोन्नती समिती मान्यता 18/03/2025
3)18/03/2025 = 98
4)28/08/2025 = 109
--------------
एकूण = 455
एकूण
विस्तार अधिकारी 47
केंद्र प्रमुख 68
मुख्याध्यापक 455
-----------------
एकूण पदोन्नती 570
मागील 10 वर्षात 10 वेळा पदोन्नती झाली नसावी , मात्र यावर्षी एका वर्षात 10 वेळा पदोन्नती झाली.
जिल्ह्यातील सर्व शिक्षक प्रशासनाच्या कामकाज बाबत समाधान व्यक्त करीत आहेत.
--------------------------------

