कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूडच्या नगराध्यक्षपदी जनतेच्याच विचाराचा नगराध्यक्ष असणार आहे असे उद्गार माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी येथे काढले.येथील सावर्डेकर कॉलनी मधील नवीन काँक्रिट गटार बांधकामांचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या कामात आपण नेहमीच अग्रेसर राहू. गेल्या ९ वर्षात अनेक राजकीय घडामोडी झाल्या पण प्रवीण पाटील म्हणून आपण सत्ता डोक्यात घुसू दिली नाही. सत्ता असो वा नसो लोकांसाठी काम करत रहाणे एवढाच विचार केला.
या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी जनसंवाद साधून लोकांच्या समस्या समजावून घेतल्या व नागरी सुविधांसाठी आपण प्रयत्नशील राहू असा शब्दही दिला. भारमल नगर,सावर्डेकर कॉलनी ,ज्ञानेश्वर कॉलनी, भोसले कॉलनी, जांभूळ खोरा, माधवनगर, प्रगती कॉलनी,महाजन कॉलनी* या काॅलनीतील रहिवाशांना शेतसारा व नगरपालिकेचा घरफाळा भरावा लागत आहे.
त्यांच्यासाठी दहा दिवसापुर्वी मा.जिल्हाधिकारी व नाम.हसनसौ मुश्रीफ यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीमध्ये मुरगूड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्याबाबतची कारवाई निश्चितच झाल्याशिवाय राहणार नाही.असे त्यांनी सांगितले.मुरगूडच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहू असे सुतोवाच देखील त्यांनी केले. सावर्डेकर कॉलनीतील महीलांनी प्रविणसिंह पाटील याचे औक्षण करुन स्वागत केले.
या वेळी समाधान हावळ, दत्तात्रय शिरसेकर,मधुकर मसवेकर,पांडुरंग राजपुत, दस्तगिर आतार,आविनाश बाबर,प्रविण लोहार, राजू जमादार आदी उपस्थित होते.
----------------------

