कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंबप संचलित छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनि.कॉलेज व दिशा इंग्लिश मेडियम स्कूल पेठ वडगाव या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रशालेच्या प्रांगणात स्केटिंगचा सलग सहा तास दहा मिनिटांचा विश्वविक्रम केला.
या स्केटिंगच्या विश्वविक्रमाचे निरीक्षण व नोंद ग्लोबल जिनियस रेकॉर्डस फाउंडेशन या नामांकित राष्ट्रीय संस्थेचे निरीक्षक डॉ.संजय जाधव आणि जे.प्रसाद यांनी केले.
या विश्वविक्रमाची नोंद ग्लोबल जिनियस रेकॉर्डस मध्ये झालेली असून सदरच्या विश्वविक्रमास शुभेच्छा देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगांवकर,कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक व शिक्षक नेते दादासाहेब लाड,जिल्हा परिषद कोल्हापूरचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव,शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूरचे अध्यक्ष एस.डी.लाड,राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ चावरेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी.बोराडे,आदर्श शिक्षण समूहाचे अध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व संचालक डी.एस.घुगरे,आदर्श शिक्षण समूहाचे सचिव एम.ए.परीट,ए.बी.पी शिक्षण समूह पारगावचे सचिव अमोल पाटील,श्रीपतराव चौगुले ज्यु.कॉलेज कोतोलीच्या उपप्राचार्या डॉ.उषा पवार,स्टील बॉडी अवॉर्ड विजेते (2018) संदीप कांबळे,महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये,नागांव ग्रामपंचायत सदस्य व फ्रंटलाईन न्यूजचे पत्रकार अमित खांडेकर पत्रकार विद्याधर कांबळे,ग्रामपंचायत मिणचे सरपंच यशवंत वाकसे,सह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंबपचे उपाध्यक्ष प्रदीप दरवान,संस्थेचे खजानिस बापूसो माने,संस्थेचे संचालक अविनाश दरवान,कुमार दरवान,सुनील खुर्द,ईश्वर स्पोर्ट्स गांधीनगरचे जॅकी चावला यांची उपस्थिती लाभली.प्रशालेचे विक्रमवीर विद्यार्थी खालीलप्रमाणे ----
सिद्धार्थ पवार, रोहित वाडकर,कार्तिक कदम,संस्कार शिंदे,अद्वैत काकडे,सुमंत पवार,सोहम खोत,शौर्य पाटील,प्रथमेश बावधाने,समर्थ बनसोडे,सोहम बावधाने,गौरव मुळे,अनुज ठोंबरे,यश नांद्रे,संग्राम बावधाने,सार्थक बारावकर,अथर्व गावडे,ओंकार बामणे,ध्रुव चव्हाण,उत्कर्ष कुंभार
वरील सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक राजेंद्र माने व संस्थेच्या सचिवा व वारणा सहकारी बँकेच्या संचालिका सुवर्णा माने यांचे प्रोत्साहन लाभले आणि प्रशालेचे व्यवस्थापक व जिमखाना विभाग प्रमुख आनंद पाटील,स्केटिंग प्रशिक्षक अथर्व माळी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच प्रशालेचे मिलिटरी इन्स्ट्रक्टर मेजर राजेंद्र पाटील,कॅप्टन सुरेश अडसूळ,प्रशालेचे विभाग प्रमुख एस.जे.सासणे, व्ही.ए.आळवेकर, बी.ए. डोंगरे, एम.आर.पाटील, ए.आर.माने,सर्व शिक्षक,प्रशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
---------------------------