गणेशोत्सवाच्या तोंडावर जरांगेंचा मोर्चा देवाभाऊवर.

Kolhapur news
By -

 

     


              कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले 


   मराठा आरक्षणासाठी जरांगे यांचा मोर्चा 29 ऑगस्ट रोजी मुंबईला जाण्यासाठी निघणार आहे.हा मोर्चा केवळ आरक्षणासाठी नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ वर आहे हे उघड झाले आहे.या मोर्चामागे अती ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राजनीती आहे हे सुद्धा साऱ्या महाराष्ट्राला समजले आहे.


   देवाभाऊ यांचे नेतृत्व महाराष्ट्राला भावले आहे आणि पन्नास वर्षात  पवारांना जेवढी  लोकप्रियता मिळाली नाही त्यापेक्षा अधिक लोकप्रियता देवाभाऊ व त्यांचे सहकारी एकनाथ शिंदे व अजित पवार यांना मिळाली आहे.याचे कारण त्यांचे उत्तम संघटन ,विकास कामांची धडाडी  व लाडक्या बहिणी ,वारकरी,शेतकरी,उद्योजक ,चाकर माने यांनी दिलेला भरघोस पाठिंबा हे होय.पवारांना हे खुपतंय.त्यामुळे जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन फडणवीस यांना लक्ष (टार्गेट)केले जात आहे. एकेक मुद्दा पाहू... 


  पवार यांनी शिंदे व अजित दादा यांना सोडून  जरांगे मार्फत फक्त देवेंद्र यांचे वर टीका सुरू केली आहे कारण ते ब्राम्हण आहेत.पवार यांची भेदनीती महाराष्ट्राला माहित आहे.जरांगेनी प्रथम देवेंद्र यांच्या आईला अपशब्द वापरले.भाजपाने त्यांचा तीव्र शब्दात निषेध केला.त्यापेक्षा एका महिलेचा आत्मसन्मान दुखावला म्हणून लाखो भगिनींनी सुद्धा निषेध केला आहे.


   मराठा समाजासाठी 10 टक्के आरक्षण देवाभाऊंनीच दिले आहे व ते कोर्टात सुद्धा टिकले आहे.वाशी येथील आंदोलनात जरांगे  यांनी मराठा समाजाला सरकारी नोकऱ्यात व शिक्षणात 27 टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी केली होती.त्या अनुषंगाने ओबीसी प्रमाणपत्रे मिळवण्याची व मराठा तरुणांना व विद्यार्थ्यांना मिळेल तेवढी संधी देण्याची मोहीम सुद्धा सुरू झाली होती. 10 टक्के आरक्षण सोडून हा प्रयास होता.चार वेळा मुख्य मंत्री झालेल्या पवारांना हे जमले नाही.महत्वाचा मुद्दा पुढेच आहे. मराठवाड्याची जमीन ओलिता खाली आणण्याचा मास्टर प्लॅन करण्याच्या तयारीत देवाभाऊ आहेत. पवारांनी फक्त पश्चिम महाराष्ट्र व तेथील साखर कारखानदारी कशी समृद्ध होईल याकडेच लक्ष दिले. ऊस तोड कामगार बहुतांशी मराठवाड्यातून  व विदर्भातून येत होते.


          पिकेल डोण तर खाईल कोण 

असा एक वाक्प्रचार प्रसिद्ध आहे.मराठवाडा समृद्ध झाला तर फडणवीसांची लोकप्रियता शिगेला पोचणार होती.सुप्रिया ताईनी पांडुरंग आणि मटण यावर केलेले भाष्य सुद्धा देवेंद्र यांची कळ काढण्यासाठीच असावे. देवाभाऊनी अत्यंत संयमाने त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.वारकरी पंथ मात्र संतापला आहे. मराठवाड्यातील बहुतेक मराठा समाज गरीब आणि रोजंदारी वर उपजीविका करणारा आहे.मोठे जमीनदार राजा सारखे राहतात. 


   मराठवाड्याचा सर्वांगीण विकास हेच याला उत्तर आहे.जरांगे यांनी त्यावर अधिक लक्ष द्यावे असे अप्रगत शेतकरी म्हणतात. मराठ्यांच्या युवकांना संविधानात्मक वर्तुळात राहून सर्व त्या सुविधा पुरवायला फडणवीस यांचे सरकार सज्ज असतांना  गणेशोत्सवाच्या तोंडावरचे हे आंदोलन फक्त राजकीय हेतूने प्रेरित आहे हे स्पष्ट झाले आहे.


                 ---------------------