कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पावसाची संततधार,पाटगाव धरणातील विसर्ग, दूधगंगा धरणाचा विसर्ग यामुळे वेदगंगा व दूधगंगा या नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.ऊसाची शेते पाण्याखाली गेली आहेत.शेतकरी आणि गावकरी या सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुरगूड शहराला महापुराचा वेढा पडला आहे.मुरगूड निढोरी रस्त्यावर तीन फुटाहून अधिक पाणी आले आहे.पाण्यात छोट्या गाड्या जाऊ शकत नाहीत.या पाण्यात अडकलेला अवजड ट्रक जे सी बी ने ओढून काढावा लागला.
मुरगूड येथील महापूर रक्षक दल व सामाजिक कार्यकर्त्यांनी या कमी पुढाकार घेत कंत्राटदार विक्रम गोधडे यांचा जे सीबी बोलावण्यात आला.गोधडे कुटुंब अशा सेवकार्यात नेहमी विनाविलंब व विनामोबदला अग्रेसर असते.त्यांच्या मदतीला शिवभक्त व नगरपरिषद कर्मचारी सुद्धा धावले. यमगे येथेही पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे.शाळांना आजही सुट्टी देण्यात आली आहे.
मुरगूड च्या पूर्वेला असलेल्या सर पिराजीराव तलावाचे पाणी सुध्दा रस्त्यावर आल्याने शहराची अवस्था बेटासारखी झाली आहे.