कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगुड येथील सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावर एक फुल व्हावे अशी बऱ्याच दिवसाची नागरिकांची मागणी होती. तलावाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे शेवाळ तयार होत असे. त्यातून मार्ग काढताना वाहनांना अनेक वेळा अपघातांना सामोरे जावे लागत असे.
हा रस्ता पुढे कापशी गडहिंग्लज आणि निपाणी या गावांना जोडला जातो.
तालुक्याचे आमदार व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी मुरगूड येथील नागरिकांच्या शिष्टमंडळाबरोबर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वरील मागणीचा पाठपुरावा केला होता.
आवश्यक तो निधी मंजूर करण्याचे आश्वासन हे दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्याच्या आत अधिकाऱ्यांना अहवाल सादर करावयास सांगितले .त्याप्रमाणे संबंधित विभागाचे अभियंता व अधिकारी संदीप मोगलेवार, नायकवडे आणि चौगुले यांनी संभाव्य पुलाच्या पाहणीसाठी मुरगूडला तातडीने भेट दिली व पाहणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत मुरगूडच्या शिष्टमंडळातील नागरिकांशी देखील चर्चा झाली. शिष्टमंडळात राष्ट्रवादी (दादा)चे शहराध्यक्ष रणजीत सूर्यवंशी,दिग्विजयसिंह पाटील,नामदेव भराडे,सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट,संजय मोरबाळे,ओंकार पोतदार,नंदकिशोर खराडे,संदीप भारमल, जगन्नाथ पुजारी,दिगंबर परीट,संपत कोळी,मारुती पुरिबुवा,बाळासो भराडे,शेखर कानडे,जगदीश गुरव,इत्यादींचा समावेश होता.
--------------------