नवी दिल्लीतील नॅशनल युथ आयकॉम पुरस्कार प्राप्त ह.भ.प. जयश्रीताई तिकांडे यांच्या समाज प्रबोधनपर किर्तनाचे नानीबाई चिखलीत आयोजन

Kolhapur news
By -

 

               


      कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


          नानीबाई चिखली येथील श्री हालसिध्दनाथ मंदिरात महाअभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 




गुरुवार दि.21 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा.नदीपासून पाणी आणणे व मुर्ती मिरवणूक काढण्यात येणार आहे.



 सकाळी 10 वा ढोल वाद्याच्या गजरात नाथांचा महाअभिषेक व गुरुमाऊली श्री कृष्णात डोणे महाराज व ऋषिकेश पुजारी व वांलगे यांच्या हस्ते महाप्रसाद हाेईल. 

           




 सांयकाळी  7 वा  ह.भ.प. जयश्रीताई तिकांडे नॅशनल युथ आयकॉम पुरस्कार प्राप्त नवी दिल्ली , अभिनेत्री, माझा ज्ञानोबा मालिका फेम यांचे प्रबोधनपर किर्तन हाेईल. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे  आवाहन श्री हालसिध्दनाथ देवस्थान, वालगे मंडळ व भक्तगण, चिखली  यांनी केले आहे . 


     ------------------------------