खडकलाटेतील सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास नेत्रदीपक आहे.- सतीश पाटील : लेखक प्रा.रवींद्र पाटील यांचा ग्रामस्थांच्याकडून गौरव

Kolhapur news
By -

 




      


         कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


       "खडकलाट येथील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी बलिदान दिले आहे.त्यांचे कार्य अभूतपूर्व असून या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास लेखक व पत्रकार प्रा.रवींद्र पाटील यांनी लिहावा.त्यासाठी ग्रामस्थांच्याकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल."असे प्रतिपादन अरिहंत को ऑफ क्रेडिट सोसायटीच्या मुख्य शाखेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी केले. 


    खडकलाट ग्रामस्थांच्यावतीने आयोजित लेखक प्रा.रवींद्र पाटील यांच्या सत्कारप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे हे होते. 


  प्रारंभी लेखक व पत्रकार प्रा.रवींद्र पाटील यांचा गौरवचिन्ह देऊन मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.सतीश पाटील पुढे म्हणाले, "देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी खडकलाट गावातील हुतात्मा परशुराम साळुंखे,निजामुद्दीन काझी,मलगोंडा पाटील,चनगोंडा पाटील, दिवाकर हरिदास,खराडे गुरुजी यांच्यासह अनेकांनी कार्य केले.यापैकी निजामुद्दीन काझी यांच्या जीवनावर आधारित'गाथा क्रांतीवीरांची 'हा चरित्रग्रंथ प्रा.रवींद्र पाटील यांनी लिहिला आहे.हा चरित्रग्रंथ खडकलाट गावासाठी अभिमानाची गोष्ट असून आज संपूर्ण महाराष्ट्रात या पुस्तकाचा गौरव करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील पीएमश्री शाळेमध्ये या चरित्रग्रंथाचे वाटप करण्यात आले आहे.निजामुद्दीन काझी यांच्या जीवनचरित्रासारखेच खडकलाटमधील सर्वच स्वातंत्र्यसैनिकांचे जीवनचरित्र लिहावे.


  ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश  चिंचणे म्हणाले,"येणाऱ्या भावी पिढीला स्वातंत्र्यसैनिकांची माहिती मिळणे अत्यंत गरजेचे आहे.त्यासाठी अशा लेखकांची समाजाला गरज असून संपूर्ण देशात खडकलाटचे नाव अजरामर करणाऱ्या प्रा.रवींद्र पाटील यांना ग्रामस्थांच्या कडून धन्यवाद देतो.त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे.यावेळी निजामुद्दीन काजी यांचे चिरंजीव नुरुद्दीन काझी म्हणाले,आमच्या वडिलांचे जीवनचरित्र लिहिण्यासाठी प्रा.रवींद्र पाटील  यांनी अपार परिश्रम घेतले.त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून शासनाच्या पीएमश्री शाळेत हे पुस्तक वितरित केले आहे.हा माझ्या वडिलांचा आणि खडकलाटवासियांचा अभिमानाचा विषय असून यासाठी प्रा.रवींद्र  पाटील यांचा कौतुक करावे तेवढे थोडेच आहे .यावेळी प्रा.रवींद्र पाटील यांनी पुस्तकाबद्दल माहिती सांगून यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले.शिवाय येत्या काळात खडकलाट मधील सर्व स्वातंत्र्य सैनिकांवर आपण पुस्तक लिहिण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. 


यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य नासर तहसीलदार,भु-लवादा निगमचे संचालक प्रवीण पाटील,हबीब परकुटे,सुभाष कुंभोजे,रमेश चिंचणे,सागर कुट,बाबासाहेब शिरगावे,ज्येष्ठ नागरिक संघटनेचे संस्थापक डॉ.दादासाहेब शिरगावे,सरकारी पदवी पूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य आर.ए.बेलेकर,प्रा.एस.ए.लोंढे, अशोक खराडे,विशाल साळुंखे,अरुण खराडे,  प्रा.अस्करली मुजावर,राजू ढंग,महांतेश शिरगावे,शिवानंद वाळवे,अजित कोडे,महेश मडिवाळ,अनिल केरकुटे,शिवाजी डोणगे, आप्पासाहेब थरकार,महादेव साळुंखे आदींसह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते बंडा सरदार यांनी स्वागत करून सूत्रसंचालन केले.प्रा.अस्करली मुजावर यांनी आभार मानले.

      






 खडकलाट : येथे लेखक व पत्रकार प्रा.रवींद्र  पाटील यांचा सत्कार करत असताना सतीश पाटील,राकेश चिंचणे,नासर तहसीलदार,बंडा सरदार,प्रवीण पाटील व इतर.



          -----------------------