गोकुळ दुध उत्पादक सभासदांच्या चेहऱ्यावर समाधान

Kolhapur news
By -

 

           



        कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


 गोकुळच्या ठेवी 322 कोटीवरून 512 कोटीवर गेल्या असून त्यामध्ये तब्बल 190 कोटींची वाढ झाली आहे. हे सर्व पहाता पारदर्शक कारभाराने गोकुळचा सभासदांच्या चेहऱ्यावर समाधान आले आहे अशा भावना आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या. 


      कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादन (गोकुळ) संघाची 9 सप्टेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभुमीवर विविध तालुक्यात संपर्क सभा सुरू असून आज करवीर तालुक्यातील सभासदांची संपर्क सभा संकल्पसिधी हॉल येथे पार पडली. आमदार सतेज पाटील ,गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी) यांच्यासह  इतर संचालक उपस्थित होते. 


गोकुळ दुधसंघाने म्हैशीचे अनुदान 40 हजारावरून 50 हजार केले असून ते पुर्वी 3 वर्षांनी मिळत असे मात्र आता म्हैस खरेदी केल्यानंतर 10 हजार, पहिल्या वेतानंतर 15 हजार, त्यानंतर 25 हजार असे अनुदान दिले जात आहे.


यावेळी संचालक अरुण डोंगळे, बाबासो चौगले, डॉ. चेतन नरके, अजित नरके, अमर पाटील, कर्णसिंग गायकवाड, शशिकांत पाटील- चुयेकर, एस. आर. पाटील, प्रकाश पाटील, बाळासाहेब खाडे, आर.के. मोरे, युवराज पाटील, बयाजी शेळके, अंजनाताई रेडकर, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संघाचे महाव्यवस्थापक ए. वाय. चौधरी, संकलन अधिकारी एस. व्ही तुरंबेकर, अकाउंटंट विभागाचे प्रमुख कापडिया पशुसंवर्धन विभागाचे प्रकाश साळुंखे, पशुखाद्य विभागाचे व्हि. डी. पाटील,  भरत मोळे,  अरविंद जोशी, डॉ. मगरे यांच्यासह विविध विभागाचे पदाधिकारी आणि कर्मचारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.






                 -------------------------