कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगुड येथील अनेक मंडळांनी गणेशाच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. महाराष्ट्रात सगळीकडे गाजत असलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाची सुद्धा एक झलक येथील पाटील गल्लीतील युथ सर्कल मंडळाच्या व्यासपीठावर पहायला मिळणार आहे.
अभिनेत्री अस्मिता खटावकर यांचे यामध्ये सूत्रसंचालन (अँकरिंग )असणार आहे.त्यामुळे महिला व मुलींची उत्सुकता शिगेला पोचली आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील असणार आहेत .
प्रथम क्रमांकाच्या महिलेला पैठणी व चषक , द्वितीय क्रमांकास चंदेरी साडी व चषक, तृतीय क्रमांक डिनर सेट अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यासह एकूण बक्षिसांची संख्या दहा पर्यंत असेल असे संयोजकांनी सांगितले.सप्टेंबरच्या ४ तारखेस सायंकाळी ७ वाजता होम मिनिस्टरची ही पर्वणी पाहायला मिळणार असल्याचे राजू चव्हाण यांनी सांगितले.
----------------------