कोल्हापूर न्यूज नेटवर्क
गणित सुलभ, रोचक व अनुभवात्मक करण्यासाठी नागाव (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे उभारण्यात आलेल्या डॉ. दीपक मधुकर शेटे यांच्या ‘गणितायन लॅब’ या अभिनव प्रयोगशाळेचे सादरीकरण नुकतेच शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या समाेर पुण्यात करण्यात आले.
शेटे यांनी लॅबचे माहितीपत्रक सविस्तर समजावून सांगितले. ते वाचल्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी शेटे यांचे कौतुक करत त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि “हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे, लवकरच कोल्हापूरला येऊन प्रत्यक्ष पाहणी करीन,” असे आश्वासन दिले.
डॉ दिपक शेटे यांच्या स्वःमालकीच्या सुमारे पन्नास लाख खर्च करून उभारलेल्या गणितायन मध्ये दुर्मिळ वजने व मापे : धान्य व वस्तू मोजण्यासाठी वापरलेले जुने धातूचे संच,प्राचीन नाणी व नोटा : मराठा साम्राज्यापासून ब्रिटिशकालीन नाणी व भारतीय चलनी नोटांचा संग्रह,पट्टया व तराजू : व्यापाऱ्यांनी वापरलेले पारंपरिक काटे, पट्टे व मोजमाप साधने,शैक्षणिक साधने : भूमिती मॉडेल्स, पझल्स, गणिताशी जोडलेल्या कला व खेळ., घड्याळे,कंपास, इ दुर्मिळ गणित मापनाचा इतिहास समजावून घेता येईल . ही लॅब महाराष्ट्राची गणितीय ओळख बनतं चालली आहे.या लॅबला आजअखेर शास्त्रज्ञ, कुलगुरु, अधिकारी, प्राध्यापक ,शिक्षक , पालक व विद्यार्थी अशा पंधरा हजार गणितप्रेमीनी भेट दिली आहे.
“शिक्षण मंत्र्यांकडून मिळालेली शाबासकी ही माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. यामुळे गणिताचा आनंद अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची उर्मी मिळाली आहे” असे डॉ. शेटे यांनी सांगितले.
-------------------------