महाराष्ट्र शासन कृषी विभागाची शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न.

Kolhapur news
By -

 

          


        कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


      महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यांच्या वतीने मौजे वडगाव येथे आज  जिल्हाअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन ग्रामपंचायत मौजे वडगाव येथील सभागृहात करण्यात आले होते. सभेचे अध्यक्षस्थानी मौजे वडगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच  स्वप्निल चौगुले हे उपस्थित होते. 


सदर जिल्हा अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमास प्रमुख वक्ते  शांतीकुमार पाटील यांनी माईन मुळा या विषयावर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे उपविभागिय  कृषी अधिकारी  पोपट  पाटील यांनी शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजना व माईन मुळा मानांकन (G I) संदर्भात मार्गदर्शन केले. 


तसेच हातकणंगले तालुका कृषी  अधिकारी स्वप्नील  माने  यांनी मक्याची शेती, योजने संदर्भात मार्गदर्शन केले तसेच विकास टारे यांनी सेंद्रिय कीटकनाशके,कीडनाशक तयार करणे संदर्भात मार्गदर्शन केले .


या कार्यक्रमास मंडल कृषी अधिकारी रमेश परिट ,  सहाय्यक कृषी अधिकारी उमेश सकटे, महादेव जाधव, सचिन आलमाने , तंटामुक्त अध्यक्ष मधुकर आकिवाटे ,  उपसरपंच व विद्यमान सदस्य सुनिल खारेपाटणे , सुरेश कांबरे , रघूनाथ गोरड , अविनाश पाटील, रावसाहेब चौगुले, मानसिंग देसाई , बबनराव चौगले, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


                     -----------------------