नवी दिल्ली : सरकारने आजपासून म्हणजेच १५ ऑगस्टपासून राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या लोकांसाठी वार्षिक फास्टॅग पास सुरू केला आहे. या पासची किंमत ३,००० रुपये आहे, जी एक वर्षासाठी वैध असेल. या पासद्वारे वापरकर्ते २०० वेळा टोल ओलांडू शकतील.
सरकारचे म्हणणे आहे की यामुळे टोल ओलांडण्याचा खर्च सुमारे १५ रुपयांपर्यंत कमी होईल आणि देशभरातील टोल प्लाझांवर होणारी गर्दी कमी होईल. या एकाच पासमुळे राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करण्यासाठी टोल प्लाझावर थांबून वारंवार टोल प्लाझावर रिचार्ज करण्याचा त्रास कमी होईल.
------------------