क्रांतिकारक व महापुरुषांच्या वेशभूषित अवतरले विद्यार्थी

Kolhapur news
By -

 

              



          कोल्हापूर न्यूज नेटवर्क

     

स्वातंत्र्य दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर चिखलीमध्ये  थोर क्रांतिकारक हुतात्मा हरिभाऊ बेनाडे , हुतात्मा मल्लू चौगुले या क्रांतिकारकांसहित विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, भारत माता ,झाशीची राणी लक्ष्मीबाई, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले इ. महापुरुषांच्या व क्रांतिकारकांच्या वेशभूषा करून प्रशालेचे विद्यार्थी शाळेत अवतरले व विद्यालयातील वातावरण देशभक्तीपर केले.


 प्रथमत: सकाळी  7.30 वा. समाजातील माजी सैनिक, वृक्षप्रेमी शिक्षणप्रेमी महादेव इराप्पा कांबळे व मुख्याध्यापका औंधकर मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी  विजय घस्ती( ग्रामपंचायत सदस्य), उमाजी कांबळे सर(शिक्षक नेते), दादासो चिखलीकर, गायत्री कांबळे , प्रभाकर मधाळे, सचिन कांबळे ,अजित कांबळे ,प्रदीप कांबळे , रणजीत कांबळे, याचबरोबर विद्यालयातील शिक्षिका शितल कांबळे, सरिता कांबळे व समाजातील युवा वर्ग व मान्यवर उपस्थित होते. 


यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपली देश प्रेम व्यक्त करणारी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व इतर देशभक्तीपर गीतांचे गायन केले. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना गोड जिलेबी चे वाटप करून भारतीय स्वातंत्र्याचा आनंद व्यक्त करण्यात आला.


          ------------------------