मुख्यमंत्री होण्यासाठी अजित पवारांचे गणपती बाप्पाला साकडे?

Kolhapur news
By -

 

           

      



पुणे : बाप्पा सर्वांच्याच इच्छा पूर्ण करतो, असे मानले जाते. त्यामुळेच महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.


 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भल्या पहाटे पुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीची पूजा व अभिषेक केला. प्रत्येकाच्या मनातील इच्छा पूर्ण होवो, असे साकडे आपण बाप्पाला घातले असल्याचे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या माध्यमातून अजित पवार यांनी गणपती बाप्पाला मुख्यमंत्री होण्यासाठी साकडे घातले का? याची चर्चा सुरू झाली आहे.


मुख्यमंत्री होण्यासाठी बाप्पाला साकडे घातले का ? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी विचारला होता. यावर उत्तर देताना अजित पवार यांनी देखील तुमच्या मनात जे आहे ते पूर्ण होवो, तसेच प्रत्येकाच्या मनातील इच्छा पूर्ण होवो. अशी प्रार्थना आपण बाप्पा चरणी केली असल्याचे म्हटले आहे


        ---------------------