अनाजी नव्हे सचिन तेंडुलकर म्हणा : देवेंद्रच महाराष्ट्राच्या विकासाचे शतक ठोकणार.

Kolhapur news
By -

            


       कोल्हापूर न्यूज  /  वि. रा .भोसले 


देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे कर्तबगार,नि:स्पृह आणि विनयशील मुख्यमंत्री आहेत.  कांहीं विरोधक त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करताना दिसतात.का तर ते ब्राम्हण आहेत.त्यांना काहींनी अनाजी पंत असे सुद्धा म्हटले.अशा लोकांची  बौद्धिक कुवत व ऐतिहासिक ज्ञान किती कोते आहे हे सुद्धा समजले.कींव येते अशांची. तेंडुलकर ,गावसकर हे सुद्धा ब्राम्हण होते.ते पण अनाजीच काय ?

          

            कोण होते अनाजी ?... 


    अनाजीपंत  हे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक प्रमुख मंत्री होते. सोयराबाईंनी जो कट रचला होता त्यात ते सामील होते असे इतिहासकार मानतात. सोयराबाईंचे पुत्र राजाराम महाराज यांना स्वराज्याची गादी मिळावी या करिता कट होता. युवराज शंभूराजे त्यावेळी पन्हाळगडावर होते. महाराजांचे देहावसान झाल्यानंतर शंभुराजे चाल करून रायगडावर आले आणि त्यांनी कटातील सर्व लोकांना शिक्षा केली. त्यात अनाजी पंत सुद्धा होते. हा झाला इतिहास. यातील अनाजी यांच्यावरील राग समजू शकतो.त्यांचा आणि फडणवीस यांचा कोणता संबंध यांनी जोडला आहे ? देवेंद्रांचा द्वेष हे त्याचे कारण आहे.अनेक मराठा सरदार सुद्धा शिवरायांच्या विरोधात होते.त्यातील एक म्हणजे मुधोळचे बाजी घोरपडे हे होय.ते शिवरायांचे चुलत बंधू होते.  विजापूरच्या आदिलशाहचे ते सरदार होते. शहाजी राजांना कैद करण्यात त्यांचाच हात होता. शिवाजी महाराजांनी बाजी घोरपडेच्या छातीत तलवार खुपसून स्वतः मारले होते. बंधु म्हणून सोडले नाही.शिवरायांचे मूळचे आडनाव घोरपडे होते हेही येथे लक्षात घ्यावे.बाजीला मारताना त्यांनी फक्त स्वराज्याचा विचार केला होता.श्रीकृष्णांनी आपल्या सख्या मामाला कंसाला सुद्धा असेच मारले होते. या दोघांनीही  जीवावर उदार होऊन शत्रूशी सामना केला होता.म्हणूनच त्यांचा आज आपण जयजकार  करतो.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी लीन झालेल्या देवेंद्र फडणवीस यांना अशी भाषा वापरणे योग्य नाही. देवेंद्र फडणवीस  यांना देवाभाऊ असे म्हंटले तरी काहींना खुपते.केवळ द्वेष.आता तुलनात्मक दृष्ट्या इतर कांहीं नेत्यांचा विचार करू. देवेंद्रांची स्वतःची एखादी मोठी शिक्षण संस्था नाही,एखादा साखर.कारखाना नाही,कोणत्या मोठ्या उद्योगात निनावी भागीदारी नाही .राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तयार झालेले ते एक राष्ट्रीय विचारांचे निस्वार्थी व्यक्तिमत्व आहे.

     आता महत्वाच्या मुद्द्याकडे वळू.

  

ब्राम्हण असलेल्या सचिन तेंडुलकरला भारत रत्न मिळाले पाहिजे म्हणून आग्रह धरणाऱ्यांनी देवभाऊंना का विरोध करावा.ते राजकारणात आहेत म्हणून ? सत्तेत आहेत म्हणून ? तुम्हांला खुर्ची मिळत नाही म्हणून  ?  देवेंद्र यांना मुख्यमंत्र्यांची खुर्ची कांहीं इंद्राने दिली नाही. लोकशाही पद्धतीने निवडून जिंकून ते तिथपर्यंत पोचले आहेत.ते ही पाहवत नाही म्हणून इ व्हि एम ,मत चोरी असे आरोप करायचे .निदान ते आरोप सिद्ध तरी करावेत.नुसतीच ओरड. विरोधकांची सत्ता असलेली.कर्नाटक सारखी अनेक राज्ये आहेत.तेथे हे आरोप का होत नाहीत.


    देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एवढे सविस्तर मांडण्याचे कारण असे की.महाराष्ट्राला आता असेच नेतृत्व हवे आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे फार मोठे व्हिजन समोर ठेवले.त्याची यादी येवढ्या छोट्यात बसणारी नाही. विकासकामांचे शतक मारल्याशिवाय ते स्वस्त बसणार नाहीत.त्यांना अनाजी काय म्हणताय ?धावांच्या शतकांचे ही शतक ओलांडणाऱ्या सचिनशी त्यांची तुलना करा.फक्त क्षेत्र वेगळे आहे एवढेच.


          ------------------------