कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये महिलाराज

Kolhapur news
By -

 

                 


           कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आज सभापती निवडी झाल्या. यामध्ये बांधकाम समिती सभापतिपदी सारिका नांदेकर, शिक्षण समिती सभापतिपदी शितल यादव, समाजकल्याण समिती सभापतिपदी श्रद्धा गायकवाड, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी विद्या पाटील यांची निवड झाली. 


पीठासन अधिकारी तथा प्रातांधिकारी मौसमी चौगले, तहसिलदार स्वप्नील पवार यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेतील राजर्षी शाहू सभागृहामध्ये ही सभा झाली.


 पदाधिकाऱ्यांच्या एकूण सहापैकी पाच ठिकाणी महिला सदस्य तर उपाध्यक्षपदी पुरुष सदस्य आहे.


बांधकाम समिती सभापती –    सारिका नांदेकर

शिक्षण समिती सभापती –   शितल यादव

समाजकल्याण समिती सभापती –  श्रद्धा गायकवाड

महिला व बालकल्याण समिती सभापती – विद्या पाटील


                   -----------------------