कोल्हापूर न्यूज नेटवर्क
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक वनिकरण कागल व श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कागल यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शाहू हायस्कूलमध्ये पर्यावरण संवर्धन व घनकचरा या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली .
पर्यावरण संवर्धन व घनकचरा या विषयावर कार्यशाळेमध्ये बोलतांना वनपाल ( राऊंड ऑफिसर ) अंबाजी बिराडे यांनी पर्यावरण समतोल व संरक्षण यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी स्पष्ट करून पर्यवरणाचे महत्त्व साध्या सोप्या उदाहरणातून स्पष्ट केले.
प्राचार्य टी. ए. पोवार यांनी पर्यावरणातील घटक व महत्त्व विषद करतांना नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य पद्धतीने व काटकसरीने वापरणे करणे गरजेचे असून पर्यावरणाची ऱ्हास करणारे घटक उदाहरणासह स्पष्ट केले.
वनपाल अंबाजी बिराडे यांचा सत्कार प्राचार्य टी ए पोवार यांनी केला. या प्रसंगी उपमुख्याध्यापक आर. एस. पाटील, पर्यवेक्षक यु. सी. पाखरे, के. एच. भोकरे, एस. आर. सुदर्शनी आदी मान्यवरासह शिक्षकवृंद, विदयार्थी उपस्थित होते. आभार के आय जमादार यांनी मानले.
कागल : कार्यशाळेत बोलतांना वनपाल अंबाजी बिराडे , शेजारी प्राचार्य टी ए पोवार आदीसह अन्य मान्यवर.
------------------


