"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" स्पर्धेत विद्या मंदिर गलगले शाळेचा कागल तालुक्यात द्वितीय क्रमांक : शाळेला मिळाले दोन लाखाचे बक्षीस

Kolhapur news
By -

       

               



           कोल्हापूर न्यूज नेटवर्क


मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" टप्पा 3 महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धेत कागल तालुक्यातील विद्या मंदिर गलगले शाळेला तालुक्यात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक (2 लाख रुपयांचे बक्षीस) मिळाले आहे . गलगले विद्यामंदिर ही शाळा आयएसओ मानांकन प्राप्त शाळा आहे. या बक्षीसामुळे शाळेचा नावलौकिक आणखीन वाढला आहे. 



शाळेने शिष्यवृत्ती तसेच इतर स्पर्धा परीक्षेत मिळवलेले यश ,केंद्र स्तर क्रीडा स्पर्धेतील सर्वसाधारण विजेतेपद क्रीडांगण सपाटीकरण ,छप्पर दुरुस्ती बागकाम, परसबाग ,कपाटे व इतर शैक्षणिक साहित्य यासाठी झालेला उठावदार शैक्षणिक उठाव, निपुण महाराष्ट्र मध्ये सुपर शाळेमध्ये झालेल्या समावेश ,विज्ञान प्रदर्शन सांस्कृतिक स्पर्धेतील सहभाग व यश ,डिजिटल क्लासरूम ,स्वच्छ सुंदर व हिरवागार परिसर ,रुचकर शालेय पोषण आहाराबरोबरच विविध शासकीय योजनांचा विद्यार्थ्यांना मिळत असलेला लाभ इत्यादी सर्वच उपक्रमामुळे शाळेला हे यश मिळाले आहे.


 यासाठी ग्रामपंचायत ,विविध संस्था, तरुण मंडळे, ग्रामस्थ, पदाधिकारी व शाळा व्यवस्थापन समितीचे आजी-माजी सदस्य, याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षक व जागरूक पालक यांचे योगदान लाभले आहे. मुख्याध्यापक  पी. बी. कापसे सरांच्या सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर शाळेला मिळालेले नेत्रदीपक यश  कौतुकास्पद ठरत आहे. शाळेच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. 


                

         ----------------------------