महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी चा मुरगूड मध्ये सत्कार.भव्य मिरवणूक.

Kolhapur news
By -

 

              


          कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


         मुरगूड ची कन्या आणि येथील लोकनेते सदाशिवराव मंडलीक  कुस्ती संकुला ची  कुस्तीगीर अमृता पुजारी हिने चोथ्या महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून महिला महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. महिला साठी कुस्ती पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  मुरगूड शहराच्या कीर्तीत अमृताने मानाचा तुरा खोवला आहे असे उद्गार पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे अध्यक्ष वीरेंद्रसिंह मंडलिक यांनी तिचा सत्कार करताना काढले.


  केशरी रंगाचा शानदार फेटा निळसर रंगाचा सूट अशा रुबाबदार पोशाखात आणि तिने जिंकलेल्या चांदीच्या गदेसह तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक बाजार पेठेतून शिवतीर्था वर आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याला पूजेसह अभिवादन करून जवाहर रोड वरील साई आखाड्यात आणण्यात  आली.तिच्या या दैदीप्यमान यशा बद्दल नागरिकांनी तिचे व आंतराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक दादासाहेब लवटे यांचे भर भरून कौतुक केले.

      यावेळी मोठया संख्येने कुस्ती  शौकीन व नागरीक उपस्थित होते.

          


                 


-------------------