पाच वर्षात म्हैशीला १३ आणि गाईला ७ रूपयांची दरवाढ करून दूध उत्पादकांचा विश्वास सिद्ध केला

Kolhapur news
By -

          


          कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      कोल्हापूर जिल्हा सह. दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) 63 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी सभासदांच्या सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.

 

   सत्ताधाऱ्यांनी 5 वर्षापुर्वी शेतकऱ्यांना किमान 2 रूपयांची दरवाढ करू असे आश्वासन दिले होते. विद्यमान संचालक मंडळाने म्हैशीच्या दुधासाठी तब्बल 13 रूपये आणि गाईच्या दुधासाठी 7 रूपयांनी वाढ करून शेतकऱ्यांचा विश्वास सिद्ध करून दाखवला आहे. या सभेस संघाच्या सर्व संचालकांसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


      भावाकडून जास्तच अपेक्षा ठेवल्या

 

 वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषद घेत गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ हे माझे लाडके भाऊ आहेत असे म्हटले होते. तर वार्षिक सभेच्या व्यासपीठावरून प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने महाडिक यांनी थेट अध्यक्ष यांनाच लाडक्या भावाने फसवलं, त्यांनी पळपुटी भूमिका घेतली  असा थेट इशारा दिल्याने आगामी निवडणुकीतील संघर्षाची ठिणगीची आग कुठपर्यंत लागणार हे काळच ठरवणार आहे.


 यंदाच्या वार्षिक सभेत मंत्री मुश्रीफ यांचे चिरंजीव आणि गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी शौमिका महाडिक यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करत सभेतील गोंधळ परंपरेला फाटा देण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे विरोधाची धार कमी करत महाडिक यांनी काही मुद्द्यांवर विरोध करत सभासदांमध्येच बसण्याचा निर्णय घेतला. एकंदरीतच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा मुलगा अध्यक्ष असताना सभेला गालबोट लागू नये, याची चिंता असल्याने महायुतीचा युतीधर्म पाळण्याची विनंती मुख्यमंत्र्यांच्या मार्फत महाडिक यांना केली. मात्र तरी देखील सभेच्या ठिकाणी प्रश्न विचारताना मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांचा विरोध महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांना उचकवणारा जाणवत होता. 


गोकुळतर्फे उभारण्यात आलेल्या स्टॉलचे उदघाटन नामदार हसन मुश्रीफ  व आमदार सतेज पाटील



            ------------------------