सीता मातेचे माहेर घर असलेल्या नेपाळमध्ये भ्रष्टाचाराचा रावण जळतो आहे.

Kolhapur news
By -

 

           


          कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले


नेपाळ हे आमच्या सीतामातेचे माहेरघर.

नेपाळ मधील जनक पूर म्हणजे रामायण काळातील जनक राजाची राजधानी.आजही जनकपुर एक  तीर्थक्षेत्र आहे .येथेच सीतामातेचे सुंदर मंदिर आहे.

  रामायणातील सीतेचे स्वयंवर स्थळ सुद्धा येथेच आणि प्रभू रामचंद्रांनी उचललेले शिवधनुष्य हे सुद्धा इथलेच.

   भगवान बुद्धाची मातृ भूमि सुद्धा नेपाळ आहे.लुम्बिनी या गावी बुद्धांचा जन्म झाला होता.शेजारच्या वैशाली (बिहार) मध्ये भगवान महाविरांचा जन्म झाला होता.योगी आणि ऋषी मुनींचा हिमालय जवळच पाठीशी आहे.

     जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या महान भारतीय संस्कृतीचा उगम याच प्रदेशातून झाला आहे.

      सीतामातेच्या पदस्पर्शाने पावन झालेला नेपाळ आज जळतो आहे. माते साठी हनुमंताने रावणाची लंका जाळली होती.

    नेपाळ मधील भ्रष्टाचार रुपी रावण जाळण्यासाठी   तेथील क्रुद्ध युवाशक्तीने हनुमानाचा अवतार घेतला आहे.

   ऐकतांना मनाला वेदना होतात पण हा नियतीचा विचित्र खेळ सुरू झालाय असे वाटते.

     विद्यार्थी आणि युवकांनी सुरू केलेले हे आंदोलन इतके भिषण आहे की तेथील पंतप्रधान  निवासात क्रांतिकारक घुसले,त्यांना मारहाण केली,पत्नीला जाळले,राष्ट्रपती भवनावर हल्ला केला.अर्थ मंत्र्याला भर चौकात मारहाण केली.सैन्य आणि पोलिस सुद्धा हैराण झाले.

       हा नियतीचा उलटा फेरा समजून घेण्यासाठी थोडे मागे जाऊ.


    भारताच्या प्राचीन भूगोला ची माहिती घेणे येथे महत्वाचे आहे.

  धुमसणारा आजचा नेपाळ आणि शेख हसीना यांची सत्ता उलथवून टाकणारा कालचा बांगला देश आणि आट्याला ही महाग झालेला भुकेला पाकिस्तान हे देश भारत देशाचे घटक होते.प्राचीन भारतीय संस्कृतीचे आधार स्तंभ होते.

  या तिन्ही देशांची आजची ही दारुण अवस्था म्हणजे नियतीने लगावलेली एक मोठी चपराक असावी किंवा कोण्या प्राचीन योग्याच्या शापाची जणू प्रचिती असावी.

   या तिन्ही देशांच्या भयानकतेच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशाच्या राजकीय स्थितीकडे  डोकावून पाहू.


   सत्ता मिळवण्यासाठी विरोधक  सरकारवर बिन बुडाचे आरोप करत फिरत आहेत.चोर चोर म्हणू

 अंधारात काठ्या मारत आहेत. कधि आई वरून शिव्या तर कधि हायड्रोजन बॉम्ब फोडण्याच्या धमक्या.


 वरील तिन्ही देशातील अराजकांनी त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. 

  कसे ते पाहू.

  आपला देश हा नवा भारत आहे.  जगाच्या क्षितिजावर उगवलेला एक नवीन प्रकाशमान तारा आहे.


    शेती उत्पादने,संरक्षण व्यवस्था , नवे उद्योग धंदे,रस्ते,रेल्वे ,हवाई वाहतूक इत्यादींमध्ये आपल्या देशाने प्रचंड प्रगती केली आहे.


     १४० कोटी लोकसंख्या सांभाळणे हे तितके सोपे काम नाही.


     बेरोजगारी कमि करण्यासाठी स्टार्ट अप सारख्या योजना प्रचंड वेगाने धावताहेत.

ए आय  तंत्रज्ञान कानाकोपऱ्यात घुसले आहे.सेमी कंडक्टर चीप ने तर कमाल केली आहे.

आता कोणाकडे हात पसरायची गरजच नाही. 


हे झाले देशाच्या विकासाबद्दल.


  जागतिक स्तरावर सुद्धा आपला देश अग्रेसर बनला आहे.


   युद्ध खोर  राष्ट्रांना बुद्धाचा  संदेश देण्याची हिंमत फक्त भारतच करू शकतो .अमेरिकेने आयात कर वाढवला म्हणून गांगरून न जाता एका आठवड्याच्या आत  स्वदेशीचा नारा देणारा भारत आता जपानलाही मागे टाकतो आहे.


    राष्ट्र प्रथम ची घोषणा देणाऱ्या मोदी सरकारने भ्रष्टाचाराच्या विरोधात कायदे केले आहेत. वक्फ बोर्डाला लगाम लावले आहे.


    आमच्या माता भगिनींचे कुंकू पुसायचे धाडस कराल तर  तुमचे अस्तित्वच पुसून टाकू असे अतिरेकी देशांना सांगणाऱ्या ऑपरेशन सिन्दुर च्या रणरागिणी सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग याच देशाने तयार केल्या आहेत.


   चोर चोर म्हणून ओरडत सुटलेल्यांनी  देशाची सरंजामी भोगून  स्विस बँकेच्या तिजोऱ्या भरल्या आहेत हे देशवासीयांनी लक्षात घ्यायला हवे.भारतीय बँकांना लुटून परदेशात दडलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत .


 आणखी काय हवंय ?


 तडफडणाऱ्या शेजारी राष्ट्रांच्या सीमा रेषा पुसून 

     टाकून अखंड भारताचा सूर्य न जाणो त्याच देशातून उदयास येईल.


            -----------------------