सोलापूर : चौथ्या महिला महाराष्ट्रा केसरी कुस्ती स्पर्धेच्या फायनल सामन्यात कोल्हापूरच्या अमृता पुजारीने बाजी मारली आहे. तिने कोल्हापूर शहरच्या वेदीका ससाणेचा 7-0 असा पराभव करत महाराष्ट्र केसरी ठरली आहे.
महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये वेदीका ससाणे आणि अमृता पुजारी या दोन्ही कोल्हापूरच्या लेकींमध्ये फायनलमध्ये कुस्ती पार पडली होती.या फायनलमध्ये अमृता पुजारीने सूरूवातीपासून आक्रामक खेळील सूरूवात केली होती. या दरम्यान तिने पहिल्यांदा वेदीकावर ताबा मिळवत 2 गुणांची नोंद केली. त्यानंतर पुन्हा एका अमृताने ताबा मिळवत आणखी 2 गुन्हांची नोंद केला. शेवटी तिने स्टेपआऊटचा एक गुण मिळवला, अशाप्रकारे पहिल्या फेरीत अमृताला 5 गुण तर वेदीकाचे शून्य गुण होते. त्यानंतर पुन्हा अमृताने वेदीकावर ताबा मिळवत 2 गुणांची नोंद केली. अशाप्रकारे अमृताने फायनलमध्ये 7-0 असा एकतर्फी विजय मिळवला होता.
या विजयानंतर आता अमृता पुजारीला चांदीची गदा आणि आणि बक्षीस स्वरूपात किया सोनेट ही कार बक्षीस स्वरूपात मिळणार आहे. तर उप महाराष्ट्र केसरी ठरलेल्या वेदीकाला बुलेट बाईक मिळणार आहे. या सोबत प्रत्येक सुवर्ण पदक विजेत्याला 51 हजार रोख रक्कम मिळणार आहे.
निर्झरा केअर फाऊंडेशनच्या वतीने सोलापुरातील हरीभाई प्रशाला मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्रात केसरी कुस्ती स्पर्धेच्या फायनल सामन्यात कोल्हापूरच्या अमृता पुजारीने बाजी मारली आहे. तिने कोल्हापूर शहरच्या वेदीका ससाणेचा 7-0 असा पराभव करत महाराष्ट्र केसरी ठरली आहे. त्यामुळे आता चांदीची गदा आणि बक्षीस स्वरूपात किया सोनेट ही कार बक्षीस स्वरूपात मिळणार आहे.
कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेत आणखी एक मानाचा तुरा
सोलापूर येथे पार पडलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरची अमृता पुजारी विजेती ठरली.
अंतिम सामन्यात अमृता पुजारीने दमदार खेळ करत प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
राज्यभरातील अव्वल महिला मल्लांचा या स्पर्धेत सहभाग होता.
अमृता पुजारीच्या या विजयामुळे कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.
विजयानंतर क्रीडाप्रेमी व चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कुस्तीतील उपांत्य लढतीची video link
https://youtu.be/9pK1qfOCXEs?si=zUGF6S3fRVo4mmSj
------------------------


