राज्यातील खाजगी शाळांना वेतनेतर अनुदान वितरित करण्यास २६६ कोटी रुपयाचे अनुदान मंजूर

Kolhapur news
By -

 

              


          कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


      महाराष्ट्र राज्य खा .प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने 23 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई मंत्रालय येथे शिक्षण मंत्री दादा भुसे सो व शिक्षण उपसचिव मा आण्णा साहेब कवळे यांची भेट घेऊन वेतनेतर अनुदान देण्याची केली होती मागणी


शिक्षण मंत्री मा .ना .दादा भुसे यांनी आमच्या संघटनेच्या लेटरहेडवर शिफारस करून निवेदन संबंधीत विभागांकडे पाठविले होते :


  संघटनेने केलेल्या उपरोक्त मागणीनुसार राज्यातील खा प्राथ. , माध्य व उच्च माध्यमिक शाळांच्या वेतनेतर अनुदांनासाठी २६६ कोटी ८१ लाख रुपये मंजूर केले आहेत . सन २००८ च्या ५ व्या वेतन आयोगानुसारच्या शाळांतील एकूण कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या ५ टक्के रक्कम वेतनेतर अनुदान म्हणून दिली जाते .


 त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील खा .प्राथ शाळांसाठी रु ७६ लाख इतके अनुदान प्राप्त झाले आहे . हे अनुदान ३१ मार्च पूर्वी अदा करून खर्ची करणेचे आहे तरी खाजगी प्राथमिक शाळांनी  आपले वेतनेत्तर अनुदान प्राप्त होणे कामी योग्य ती सतर्कता शाळांनी  ठेवावी असे आवाहन महाराष्ट्र खाजगी प्राथ. शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत बा रसाळे यांनी केले आहे .

'

                       ------------------------