जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार : राज्यात कोल्हापूर जिल्ह्याला उल्लेखनीय स्थान

Kolhapur news
By -

                   


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


   कोल्हापूर जिल्ह्याने १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात चांगली कामगिरी केली असून राज्यात टॉप 5 जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये (५वा क्रमांक) स्थान मिळवले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


या कार्यक्रमात सर्व जिल्ह्यांचे मूल्यमापन काही ठराविक डिजिटल निकषांवर झाले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची  कामगिरी केली . त्यामध्ये १) शासकीय सेवा ऑनलाइन करणे, २) ई-ऑफिस प्रणाली (e-Office) ३) अधिकृत वेबसाईट सुधारणा, ४) रिअल-टाइम डॅशबोर्ड ५) WhatsApp / डिजिटल सुविधा ६) नवीन तंत्रज्ञानाचा वापर ७) GIS तंत्रज्ञान वापर  या गोष्टींचा समावेश होता. 


   यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे  प्रशासन पारदर्शक, जलद आणि नागरिकाभिमुख झाले. डिजिटल कामकाजामुळे वेळ आणि खर्च कमी झाला. राज्यात कोल्हापूर जिल्ह्याला उल्लेखनीय स्थान मिळाले


             --------------------------