मुंबई : मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावरील उपोषण संपल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत. त्यासंबंधीचे जीआरही सरकारने काढले आहे.
त्यामुळे जरांगेंनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातून लिंबू सरबत घेऊन आपले उपोषण सोडले. यामुळे गत शुक्रवारपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा तिढा यशस्वीपणे सुटला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवस त्यामुळे ,त्याचा फटका त्यांच्या प्रकृतीला बसला. आता उपोषण सोडल्यानंतर त्यांना जेजे रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यासाठी एक विशेष रुग्णवाहिका आंदोलनस्थळी आझाद मैदानावर दाखल झाली होती. उपचार झाल्यानंतर ते आपल्या गावी म्हणजे आंतरवाली सराटीकडे रवाना होतील.
हा देवाभाऊंचा मास्टरस्ट्रोक
देवाभाऊंचा मास्टरस्ट्रोक !! देवा भाऊ मनःपूर्वक अभिनंदन व आभार ! मराठा समाजच्या हितासाठी कालही प्रामाणिक होतात आजही आहात आणि उद्याही राहाल हे शासन निर्णयातून दाखवून दिलंत. प्रसंगी आरोप, टीकाही सहन केल्यात ! तमाम समाज बांधवांना आपला अभिमान आहे, पूर्ण विश्वास आहे व राहील. धन्यवाद देवभाऊ !!! जय शिवराय, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
------------------------


