मराठा समाजात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण

Kolhapur news
By -

 

                      



           कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


      गेले अनेक वर्षे गाजत असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न मुंबईतील आंदोलनाने यशस्वी झाला आहे. 

    हैदराबाद गॅझेटीअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा कुणबी किंवा कुणबी जातीचे प्रमाणपत्र  देण्याची कार्यवाही विहित करण्याबाबतचा दिनांक २.९.२०२५ चा शासन आदेश (GR) काढण्यात आला आहे.

  जी आर मधील प्रस्तावनेत मराठवाड्याच्या भूमीचे सुंदर विवेचन सुद्धा करण्यात आले आहे.

  मराठवाडा ही संतांची भूमि आहे.या भूमीवर सातवाहन,वाकाटक, चालुक्य,यादव इत्यादी राजवटींचे राज्य होते.देवगिरीचा किल्ला हा त्यांच्या शौर्याचे प्रतिक मानण्यात येते.

  याशिवाय याच भूमीत अनेक तीर्थ क्षेत्रे आहेत.औंढा,परळी, बैजनाथ,माहूरगड,तुळजापूर,पैठण,आपेगाव या पवित्र तीर्थक्षेत्रांनी ही  भूमि पावन व समृद्ध झाली आहे .

      जी आर चा लाभ मराठवाड्यातील औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर),परभणी,नांदेड,बीड उस्मानाबाद,(धाराशिव) या जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला अधिक होणार आहे.निजाम काळात त्यांना कापू (कुणबी) असे मानले जायचे.

   या पाच जिल्ह्याशिवाय इतरही जिल्ह्यातील कुणबी प्रमाणपत्र धारक  युवकांना व विद्यार्थ्यांना सुद्धा याचा लाभ होणार आहे.

    मनोज जरांगे यांच्या  या आंदोलनास यश आले आहे. मराठा समाजात त्यामुळे उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे.


            --------------------------