कोल्हापूर न्यूज नेटवर्क
विसर्जनानंतर काठावर पुन्हा वाहून आलेल्या गणेश मूर्तींचे नदीमध्ये खोलवर जाऊन आज पुनर्विसर्जन करण्यात आले.
मुरगूड येथील शिवभक्तांनी या विधायक कार्याची धुरा सांभाळली. सोशल मीडिया वरील आवाहन तसेच प्रसार माध्यमांनी दिलेले वृतांत यातून या युवकांनी गणेश मूर्तींच्या पुनर्विसर्जनाची मोहीम हाती घेतली .त्यामळे मूर्तींची विटंबना थांबली आहे.
शहरातील सार्वजनिक मंडळांच्या तब्बल पंचवीसहुन अधिक आणि ५०० हून अधिक घरगुती मूर्तींचा यात समावेश होता.
कुरणी घाट आणि दत्त मंदिर घाट या दोन ठिकाणी शिवभक्तांनी हा उपक्रम राबवला .सकाळी साडेपाच वाजता ही मोहीम सुरू झाली . युवकांनी सर्वप्रथम सार्वजनिक मंडळांच्या मोठाल्या मूर्ती खोलवर पाण्यात नेऊन विसर्जित केल्या .त्यानंतर काठावर वाहून आलेल्या गणेश मूर्तींचे मानवी साखळी करून आतमध्ये जात पुनर्विसर्जन केले.
याचबरोबर दोन्ही घाटांवर तब्बल दोन ट्रॉली कचरा मिळून आला .हा देखील जमा करून घाटांची स्वच्छता केली. पाण्यामध्ये नागरिकांनी फोटो फ्रेम विसर्जित केल्यामुळे त्यांच्या काचा पायामध्ये लागत होत्या. त्याचबरोबर गणपतीला असणारे लोखंडाचे स्ट्रक्चर आणि पायामध्ये आलेल्या गणेश मूर्ती यांची विटंबना होऊ न देता एका बाजूने सर्व गणेश मूर्ती काढून घेत त्यांना खोलवर पाण्यात विसर्जित करण्यात आले. शिवभक्त स्वयंसेवकांच्या या उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत आहे.
----------------------

