चोऱ्यांबाबत बाहेरून येणाऱ्या फेरीवाल्यांवर नागरिकांचा संशय : रात्रीची गस्त वाढवण्याची पोलिसांकडे मागणी.

Kolhapur news
By -

 

                      


         

         कोल्हापूर न्यूज नेटवर्क  

 

            सध्या मूरगुड शहरांमध्ये चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पार्श्वभूमीवर मुरगूड शहरांमध्ये काही भंगार व्यवसायिक, तसेच छोटे मोठे साहित्य घेऊन येणारे,केस गोळा करणारे, असे फेरीवाले येऊन गल्लोगल्ली  फिरत असतात .त्यांची कुणाकडे नोंद नसते .नागरिकांनी या फेरीवाल्यांच्यावरच चोरीचा संशय घेतला आहे.अशा फेरीवाल्यांची नोंद ठेवणे आवश्यक आहे .त्यांच्या ओळखपत्रांची सुद्धा नोंद असणे आवश्यक आहे. बहुतेक फेरीवाले सीमाभागातून सुध्दा येतात अशी माहिती व संशय आहे.बंद घरे बघून कुलपे फोडून चोर चोरी करतात.  त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटतात. 

याबाबत नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने मुरगुड पोलीस स्टेशन कडे गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.फेरीवाल्यांची शहराच्या सीमेवरच ओळख पडताळणी व्हावी अशीही मागणी  नागरिकांनी केली आहे.


 शहरामध्ये झालेल्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे  वातावरण आहे. कित्येक दिवसांपासून चोऱ्या होत असून सुद्धा पोलिस तपासात कांहीं प्रगती नाही त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.  


 शिष्टमंडळात प्रा. संभाजीराव अंगज, प्रा. सुनील मंडलिक, शिवभक्त सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, विनायक मुसळे, तानाजी भराडे, समीर हळदकर, जावेद मकानदार, प्रफुल्ल कांबळे, रघुनाथ बोडके जगदीश गुरव, विशाल भोपळे, विनायक मेटकर, संकेत शहा,प्रकाश पारिषवड जितेंद्र मिठारे यांच्यासह अन्य कांहीं नागरिकांचा समावेश होता.

    निवेदनाची प्रत वरिष्ठ पातळीवर सुद्धा पाठवण्यात येणार आहे असे प्रतिनिधींनी कोल्हापूर न्यूजला सांगितले.




               ----------------------