कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र, कर्नाटक व अन्य राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून श्रीक्षेत्र आदमापुर (ता.भुदरगड) येथील संत बाळूमामाच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविक वाढत होतं आहे त्यामुळे पार्किंगसाठी भव्य वाहनतळ , सुसज्ज अन्नछत्र सार्वजनिक स्वच्छतागृह व शौचालये उभारण्याचा मानस असल्याचे मत कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे व अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.
आदमापूर (ता.भुदरगड ) येथे प्रधान कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
ते म्हणाले बाळूमामाची शेकडो बकरी राज्यभर फिरतात.अनेक राज्यातून बाळूमामा दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.बाळूमामा अंधश्रद्धेच्या विरोधात होते पण आज ढोंगी लोकांनी बाळूमामाच्या नावावरती अंधश्रद्धा पसरवण्याचे काम सुरू केले आहे .अशा लोकां पासून भाविकांनी दूर राहावे. आदमापूर येथे येऊन फक्त बाळूमामाचे दर्शन घेऊन आपल्या इच्छा पूर्ण करून घ्याव्यात. बाळूमामाचे वंशज कोणीही नाही त्यामुळे काही जण भूलथापा ठोकण्याचे काम करत आहेत .
ते म्हणाले ट्रस्टीमध्ये काही गैरसमजूतीतून हेवेदावे होते मात्र बाळूमामा देवालयाचा कारभार सर्व विश्वस्तांना विश्वासात घेऊन सुरळीत सुरू आहे. माध्यमातून चुकीच्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्याचा ट्रस्टशी काडीमात्र संबंध नाही . बाळुमामाची सेवा करण्यासाठी अनेक मेंडके, भक्तगण बकऱ्यात आहेत . पण काही ठिकाणी मी देवरसपण पाहतो अशी खोटी बतावणी करून लोकांना लुबाडण्याचे काम केले जात आहे. अशा लोकांच्या पासून सुद्धा सावध राहावे जे लोक बाळूमामाचा चुकीच्या पद्धतीने प्रसार प्रचार करत आहेत. बाळूमामा देवालया संदर्भात खोटी माहिती प्रसिद्ध करून देवाची नाहक बदनामी करत आहे अशा सर्वांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे अशी माहिती त्यांनी दिली .
यावेळी सचिव रावसाहेब कोणेकरी,रामण्णा मरेगुद्री,तमण्णा मासेरेडी, पुंडलिक होसमणी ,भिकाजी शिनगारे, संदीप मगदूम, सरपंच विजय गुरव, आप्पासाहेब पुजारी, शिवाजी मोरे ,दिलीप पाटील, दत्तात्रय पाटील ,दिनकरराव कांबळे ,यशवंत पाटील, बसवराज देसाई, संभाजी पाटील, इंद्रजीत निंबाळकर, विनायक शिंदे उपस्थित होते.
आदमापूर येथे सुविधा संबंधी माहिती देताना कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे, अध्यक्ष धैर्यशील भोसले व इतर
------------------------


