आता व्हॉट्सअपवर उतारे मिळणार - मुख्यमंत्री : २०० सेवा व्हाट्सअप वर मिळणार

Kolhapur news
By -

 


मुंबई : डिजिटलाइझ पद्धतीने सेवा देण्याचे काम सरकार सुरू करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागरिकांना आता व्हॉट्सअपवर सेवा मिळणारअसून, त्यात 200 सेवा  मिळणार आहेत. या योजना 26 जानेवारीपर्यंत नागरिकांना डिजिटलाइझ पद्धतीने मिळण्यास सुरुवात होणार असल्याचे देखील फडणवीस यांनी सांगितले .


पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा सेवा हमी कायदा केला होता, याची आपल्याला कल्पना आहे. आता आपले सरकारचे व्हर्जन जुने झाले असून आपण समग्र नावाच्या संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार, नागरिकांना कोणत्या योजनांची निकड आहे, याचा अभ्यास केला आहे. आता आपण डिजिटल पद्धतीने सेवा देण्याचे प्रयत्न करणार आहोत. लोकांकडून जी मागणी येते,  त्यात सेवा आणि योजनांची मागणी येते. त्यामुळे डिजिटलाइझ पद्धतीने सेवा देण्याचे काम सरकार सुरू करणार आहे.


राज्यात सेवा आणि सुविधा संदर्भातील डिजिटलाइझ पद्धतीचा पहिला टप्पा 26 नोव्हेंबरपर्यंतच पूर्ण होईल. तर 200 सेवा आणि योजना 26 जानेवारीपर्यंत आणि संपूर्ण सेवा 1 मे पर्यंत पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सरकारकडे असलेल्या रेकॉर्ड वरूनच आपण माहिती भरणार आहोत, त्यामुळे आपले सरकारचे हे दुसरे व्हर्जन येत आहे. यात चार टप्पे असतील, त्यामुळे नागरिकांना केलेल्या अर्ज सध्या कुठे आहे, हेही पाहता येणार आहे. तसेच लोकांना डिजिटल सेवा मिळणे आणि प्रेडेक्टेबल होणार, व्हॉट्सअपवर देखील सेवा उपलब्ध करून देणार आहोत, अशी देखील माहिती फडणवीस यांनी दिली.


           ------------------------------