कोल्हापूर न्यूज नेटवर्क
TET अनिवार्य करण्याच्या विरोधात उत्तर प्रदेशने पुनर्विचार याचिका दाखल केली . असून त्याची सुनावणी 16 सप्टेंबरला होणार आहे तामिळनाडू सरकारनेही पुनर्विचार याचिका दाखल केली आहे . मग आमचे महाराष्ट्र शासन मागे का ? असा सवाल महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीने समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी शिक्षण मंत्री नाम . दादा भुसे यांना केलेला आहे . महाराष्ट्र शासनावर दबाव वाढवून महाराष्ट्र शासनानेही पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी संघटने मार्फत जोरदार प्रयत्न चालू केले आहेत .
यासंदर्भात खासदार , आमदारांना पत्रे दिलेली आहेत तथापि आपले शासन अजून हालचाल करत नाही , म्हणून शासनावर दबाव आणण्यासाठी सर्व शिक्षकांची सहयांची मोहीम सुरू केली आहे . "सर्व शिक्षकांचा एकच नारा !महाराष्ट्र शासन याचिका दाखल करा " असा नारा दिला आहे .तरी TET सक्ती विरोधात पुर्नविचार याचिका दाखल करण्यासाठीच्या सह्यांच्या मोहिमेची लिंक सर्व शिक्षकांनी भरावी व या लढयात सामील व्हावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे .
भरण्यासाठीची लिंक
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf9W-HACoK8f1M9o86lKtUYQ0B-5NenbCbagr7vcXP9_-Pd6g/viewform?usp=sharing&ouid=105227254939180568316
----------------------

