अंबप सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

Kolhapur news
By -

 

                


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


                    हेरले /प्रतिनिधी

अंबप विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था अंबप या संस्थेची ८६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली .सभेस प्रमुख पाहुणे विश्वनाथ माळी विरशैव बँक शाखा व्यवस्थापक, बापूसाहेब यशवंत पाटील सहकार समूह अध्यक्ष व संस्थेचे मार्गदर्शक संचालक अँड. राजवर्धन पाटील (साहेब),ग्रामपंचायत सदस्य सोमराज पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन व अंबपचे माजी सरपंच डॉ. बी. के. पाटील यांनी संस्थेची माहिती सांगितली.


   संस्थेची वार्षिक उलाढाल ९ कोटी ४५ लाख, कर्जे २ कोटी ४५ लाख, गुंतवणूक २२ लाख, सर्व प्रकारचे फंड २० लाख ६० हजार भाग भांडवल ४० लाख ५७ हजार,  निव्वळ नफा ३ लाख ६७ हजार झाला आहे. संस्थेची शंभर टक्के कर्ज वसुली झाली असून धान्य विभाग व खत विभाग नियमितपणे सुरू आहे, नागनाथ यात्रेनिमित्त सभासदांना डीव्हीडंट ४ टक्के प्रमाणे  रक्कम रुपये १ लाख ५८ हजार वाटप करणार असल्याचे माहिती दिली.संस्थेचे मार्गदर्शक संचालक अँड. राजवर्धन पाटील (साहेब) यांनी सभासदांना मार्गदर्शन केले,प्रमुख पाहुणे विश्वनाथ माळी साहेब यांनी मनोगत व्यक्त केले.


         स्वागत संस्थेचे व्हा. चेअरमन पोपट जाधव यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद थोरात यांनी केले,अहवाल वाचन व नोटीस वाचन संस्थेचे सेक्रेटरी हिंदुराव मुळीक यांनी केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी, शासकीय सेवेत निवड झालेले , सेवानिवृत्त झालेले व ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार प्रमुख पाहुणे व संचालक यांच्या हस्ते करण्यात आला. आभार संस्थेचे संचालक वसंतराव विभुते यांनी मानले व सभा खेळीमेळीत पार पडली. यावेळी संस्थेचे संचालक, सभासद  व कर्मचारी उपस्थित होते.


             ---------------------