वरिष्ठांनी गाढवाला घोडा म्हटले की, आपणही त्याला घोडाच म्हणायचे - नितीन गडकरी

Kolhapur news
By -

 



 नागपूर : वरिष्ठांनी गाढवाला घोडा म्हटले की, आपणही त्याला घोडाच म्हणायचे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सरकार व प्रशासकीय कार्यपद्धतीवर खंत व्यक्त केली. सरकारमध्ये काम करताना जे वरिष्ठ सांगतात तेच करायचे असते. अधिकाऱ्यांवर नेत्यांच्या जवळच्या लोकांना कंत्राट देण्याचा दबाव असतो, असेही ते यावेळी म्हणाले.


नितीन गडकरी यांचा स्पष्टवक्तेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. राजकारणात असलेली त्यांची स्पष्ट व थेट बोलण्याची शैली त्यांना इतर नेत्यांपासून वेगळी करते. ते आपले मत कोणत्याही दडपणाशिवाय थेट मांडतात. त्यातून अनेकदा वादही निर्माण होतात. पण त्यानंतरही गडकरी सातत्याने सरकार व प्रशासनातील कच्च्या दुव्यांवर भाष्य करताना दिसून येतात. त्याची प्रचिती नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात पुन्हा एकदा आली.

            ----------------------