कोल्हापूर न्यूज नेटवर्क
भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ऐन भरात आली होती.सन १९४२च्या क्रांतीने देशभरातील जनता अक्षरश: पेटून उठली होती.जीवाची पर्वा न करता हजारो राष्ट्रभक्त या संग्रामात उतरले.कोल्हापूर विभागाचे नेतृत्व देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या कडे होते.
त्यांच्याच नेतृत्वाखाली गारगोटी येथील सरकारी कचेरीवर हल्ला करण्याचा धाडसी निर्णय या परिसरातील कांहीं स्वातंत्र्य सैनिकांनी घेतला.सध्याच्या भुदरगड तालुक्यातील पाली येथील एका गुहेत हा धाडसी कट रचण्यात आला. कुर येथील पूल उडवून देण्याची योजना सुद्धा यात होती.या किंवा अशा हल्ल्या मध्ये कोणताही राष्ट्र विघातक हेतू नव्हता तर जुलमी ब्रिटिश सरकारला जेरीला आणून त्यांचे सिंहासन डळमळीत करणे हाच उद्देश होता.
गारगोटी येथील या हल्ल्यात काहींना वीरमरण आले.तो दिवस म्हणजे १३ डिसेंबर१९४२ हा होय. हा दिवस क्रांतीदिन म्हणून पाळला जातो.या क्रांती लढ्यात हुतात्मा झालेल्या क्रांतिवीरांची नावे याप्रमाणे.
१ नारायण वारके , कलनाकवाडी, ता.भुदरगड,
२. शंकरराव इंगळे,सेनापती कापशी, ता.कागल.
३. करविरय्या स्वामी ,सेनापती कापशी, ता.कागल.
४. मल्लाप्पा चौगुले, नानीबाई चिखली, ता.कागल.
५.हरिबा बेनाडे, नानीबाई चिखली, ता.कागल.
६. तुकाराम भारमल ,मुरगूड, ता. कागल.
७.नरसु परीट , अक्कोळ ता. चिक्कोडी
८. परशुराम साळुंखे, पट्टणकोडोली, ता. चिक्कोडी.
९.बळवंत जबडे, चिक्कोडी.
या क्रांतिकारक हुतात्म्यांना त्रिवार अभिवादन.
---------------------------------

