कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापुरातील शेंडा पार्क इथल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीमध्ये उभारण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध वास्तूंचा उद्घाटन सोहळा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते संपन्न झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच निवासी डॉक्टर आणि परिचारिकांसाठी या ठिकाणी हॉस्टेल, ऑडिटोरियम, परीक्षा व व्याख्यान कक्ष अशा विविध वास्तूंची उभारणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर फॉरेन्सिक विभागासाठी स्वतंत्र इमारत आणि शवविच्छेदनगृहाची उभारणी करण्यात आली आहे.
नव्याने प्रस्तावित ११०० बेड्सच्या हॉस्पिटल इमारतीचे कामही प्रगती पथावर आहे. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना शेंडा पार्क हे भविष्यातील प्रशासकीय केंद्र ठरणार आहे. आरोग्य सुविधांबरोबरच सर्व प्रशासकीय सेवा, सर्किट बेंच, जिल्हा क्रीडा संकुल, आयटी पार्क यांची उभारणी शेंडा पार्कचा चेहरा मोहरा बदलणारी ठरणार आहे. विक्रमी वेळेत ही सर्व कामे पूर्ण होत आहे याचा मनस्वी आनंद आहे. या परिसराचा लोकप्रतिनिधी म्हणून या सर्व विकासकामांमध्ये सहाय्यभूत ठरलो याचे समाधान असल्याची भावना यावेळी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त तथा प्रशासक के मंजूलक्ष्मी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे, डॉ. अजित लोकरे यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
-----------------------------


