नानीबाई चिखलीत शौर्य दिनानिमित्त अभिवादन

Kolhapur news
By -

 

               



              कोल्हापूर न्यूज नेटवर्क



नानीबाई चिखली येथील बौद्ध नगर मधील उपासिकांनी तथागत बुद्धांच्या शांततेच्या मार्गाने एकत्र येत नवीन वर्षाचे स्वागत आपल्या 500 शूरवीर पूर्वजांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून केले.याप्रसंगी 31 डिसेंबर रोजी ठीक 12.00 वाजता नगरातील बाल चमूंनी  जय स्तंभाची देशाच्या तिरंगी रंगात प्रतिकृती केली होती.


या प्रतिकृतीसमोर तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन केले व जय स्तंभाला तसेच सर्व महापुरुषांना पुष्प अर्पण केली.तसेच मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून सामूहिक बुद्ध वंदना, त्रिशरण, पंचशील घेऊन आपल्या  500 शूरवीर पूर्वजांना अभिवादन केले. याप्रसंगी नगरातील सर्व उपासक ,उपासिका व लहान ,थोर व तरुण मंडळी उपस्थित होते.





           ---------------------------