बाळूमामा नवीन वर्ष आम्हांला सुखाचे जाऊदे.नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांचे मामांना साकडे.

Kolhapur news
By -

 

        


           कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


      आदमापूरचे संत बाळूमामा देवस्थान म्हणजे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान होय.नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्या घेण्यासाठी सुद्धा या मंदिरात हजारो भक्तांनी हजेरी लावली.भक्तांना बाळूमामा जणू आपल्या.कुटुंबातीलच वाटतात.ते देव्हाऱ्यात नसून प्रत्येकाच्या हृदयात वसलेले आहेत असा अद्भुत भक्तिभाव येथे पहायला मिळतो.

  

  डिसेंबर ,जानेवारी हे वास्तविक इंग्रजी महिने.मामांचे सर्व सोहळे मराठी महिने आणि तिथी नुसार सुरू असतात . भाविकांना मात्र यापेक्षा दैनंदिन व्यवहारात मामा हवे असतात.त्यामुळे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मंदिरात भाविकांनी अफाट गर्दी केली होती.इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा ,सद्भावना आणि शुभाशीर्वाद यांचा अनोखा संगम दक्षिण महाराष्ट्रातील या विख्यात मंदिरात पाहायला मिळाला.






          ------------------------------