नगर परिषदेच्या स्वच्छता व आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला नूतन नगराध्यक्षा यांचा सत्कार.

Kolhapur news
By -

 

          

            


         कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


          मुरगूड नगर परिषदेच्या स्वच्छता व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या नूतन नगराध्यक्षा सौ.सुहासिनी प्रवीणसिंह पाटील यांचा सत्कार करून त्यांना व  नूतन नगरसेवकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.हा हृद्य सोहळा स्वच्छता कार्य सुरू असतानाच हुतात्मा तुकाराम चौक येथे संपन्न झाला.


    हे कर्मचारी रोज शहर स्वच्छतेचे काम करतात.मुकादम बबन बारदेसकर यांच्या देखरेखी खाली पहाटे पासून हे काम सुरू असते.त्यांच्या या अथक योगदानामुळे मुरगूड नगरपरिषदेला दोन वेळा केंद्र सरकारने गौरविले आहे.शहराला महिला नगराध्यक्षा लाभल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी कौटुंबिक आत्मियतेने नुकताच त्यांचा सत्कार केला तेंव्हा नगराध्यक्षा व नूतन नगरसेवक सुद्धा भारावून गेले.


सत्काराला उत्तर देतांना नगराध्यक्षा सुहासिनी देवी पाटील म्हणाल्या की , आपण सर्वांनी मिळून आता मुरगूड शहर स्वच्छ व सुंदर ठेऊया च शिवाय शहराच्या अन्य गरजा मध्ये सांडपाणी योजना,स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा,सी सी टीव्ही कॅमेरे,रस्ते यांचा ही विकास करूया.आपल्या सर्वांच्या सहकार्याने मुरगूड नगरीला वैभव प्राप्त होईल याचा मला विश्वास वाटतो.




                    --------------------