कागलच्या सर पिराजीराव पतपेढीस सहकार भारतीच्या वतीने आदर्श पतसंस्था पुरस्कार : राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

Kolhapur news
By -

 

                


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


       कागलच्या प्राथमिक शिक्षक पतपेढीस आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त केंद्रीय संघटन असलेले सहकार भारतीच्या वतीने आदर्श संस्था पुरस्काराने सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयजी जोशी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आहे. यावेळी महामंत्री विवेक जुगादे, शिरीष देशपांडे, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष  संजय पाटील, सागर चौगुले, अरविंद मजलेकर, सहकार भारतीचे जिल्हा पतसंस्था प्रतिनिधी बाळासाहेब निंबाळकर सर, शाहू शिक्षक आघाडी कागलचे  प्रमुख सुनील पाटील आदी उपस्थित होते.


   सर पिराजीराव पतपेढीने 90 वर्षाच्या कारकिर्दीत 106 कोटी ठेवी 87 कोटीचे कर्ज वाटप करत असताना सभासदासाठी विविध योजना राबवल्या आहेत. सभासद कर्ज मुक्ती योजना व कुटुंब कल्याण योजना राबवून मयत सभासदांना 100% कर्जमाफी दिली जाते. सभासद प्रॉव्हिडंट फंड योजना,प्रत्येक वर्षी सभासदना भेटवस्तू देऊन उचांकी डिव्हिडंट वाटप केला जातो. संस्थेचे एकूण 661 सभासद असून संस्थेच्या तीन स्वमालकीच्या शाखेत कामकाज सुरु आहे.


  पुरस्कार संस्थेचे चेअरमन प्रदीप बुधाळे - पाटील, व्हा.चेअरमन विठ्ठल पाटील, संचालक बाळासाहेब तांबेकर, नेताजी कमळकर,बाळासाहेब खामकर, पी. आर. पाटील, अनिल डवरी, सौ. वैशाली भारमल,सौ. रोहिणी लोकरे, व्यवस्थापक संताजी पाटील यांनी स्वीकारला.


      -----------------------------------------