नानीबाई चिखलीतील स्पर्धेत २९ संघांच्या सहभागाने कबड्डीचा जल्लोष : सर पिराजीराव घाटगे महाराज जयंतीनिमित्त स्पर्धेला मोठा प्रतिसाद

Kolhapur news
By -

 

                     


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


 येथे छत्रपती शाहू महाराजांचे धाकटे बंधू व कागल संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत पिराजीराव घाटगे ऊर्फ बापूसाहेब महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेत एकोणतीस संघ सहभागी झाले. यामध्ये पुरुष गटात अठरा तर महिला गटात अकरा संघानी  उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला .


गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी ट्रस्टचे सदस्य राजे वीरेंद्रसिंह घाटगे , लेखिका व इतिहास अभ्यासिका सौ नंदितादेवी घाटगे, चीफ एक्झिक्यूटिव्ह शिवाजीराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

 पिराजीराव घाटगे शारीरिक शिक्षण धर्मादाय न्यास कोल्हापूर यांच्या वतीने श्रीमंत जयसिंगराव घाटगे क्रीडा संकुल येथे प्रकाशझोतात या स्पर्धा सुरू आहेत.  पुरुष गटात शिव -शाहू चिखली, नवजीवन शिंदेवाडी, स्वामी समर्थ एकोंडी ,व स्वराज्य सांगाव या संघांनी उपांत्य फेरीत मजल मारली आहे. तर महिला गटात साधना क्रीडा मंडळ म्हालसवडे ता करवीर, शिवछत्रपती हुपरी,जय हनुमान बाचणी ता. करवीर व शाहू क्रीडा मंडळ नानीबाई चिखली या संघांनी उपांत्य फेरीत मजल मारली आहे. 

या स्पर्धेस महिला व पुरुष दोन्ही गटात चुरशीचे सामने होत आहेत. त्यास कबड्डी प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पंच म्हणून के.बी. चौगुले, जीवन पाटील, गजानन पाटील, संतोष डवरी, नितेश पाटील, प्रवीण पठाडे, आधी काम पाहत आहेत.

                 

     नानीबाई चिखली : येथे आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनावेळी गटशिक्षण अधिकारी सारिका कासोटे . शेजारी सौ नंदितादेवी घाटगे, विरेंद्रसिंहराजे घाटगे , शिवाजीराव पाटील , यशवंत पाटील , सुरेश पाटील , केंद्रप्रमुख संजय चिखलीकर  , बी आर तुकान , के बी चौगुले , विष्णू तुकान ,अमित काईत व इतर ( छाया:  जमीर फोटो  )



     




          

  
               -----------------------