कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाच्या सदस्या शिल्पा शशिकांत खोत यांची तर उपाध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे गडमुडशिंगी मतदारसंघातील सदस्य तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमोल येडगे होते.
निवडीनंतर नूतन अध्यक्ष खोत व उपाध्यक्ष पाटील यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी आदींच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार झाला. यानंतर जिल्हा परिषद सदस्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
या निवडीनंतर बोलताना अध्यक्ष शिल्पा खोत म्हणाल्या, " हे आमच्या प्रामाणिकपणा आणि निष्ठा यांचे फळ आहे. मिळालेले हे अध्यक्ष पद भावेश्वरी चरणी अर्पण करत आहोत."
----------------------------------


