कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड च्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी प्र. पाटील यांनी स्वीकृत नगरसेवक राहुल शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अभिष्ट चिंतन केले.त्यावेळी इतरही काही नगरसेवक उपस्थित होते.
नगरपालिका प्रशासनात नगरध्यक्षानी आयोजिलेला हा एक स्तुत्य उपक्रम मानला जातो. मध्यन्तरी सफाई कामगारांना सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या मंगलमय कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या होत्या. कर्मचारी व सहकाऱ्यांना प्रोत्साहन देणे एक चांगला शिरस्ता मानला जातो. त्यामुळे सर्वाना प्रेरणा मिळते.विविध प्रभागातील सर्व समस्या व विकासाभिमुख अशा कामांची दररोज दखल घेतली जाते. यामुळे प्रशासनात एक प्रकारची सुसंगती आल्याचे बोलले जात आहे. गावातील तलाव ते निपाणी राधानगरी राज्य मार्ग यांना जोडणाऱ्या रस्त्याचे तीस फुटाचे रुंदीकरण करण्यासाठी आराखडा तयार केला जात आहे असे यावेळी सांगण्यात आले. दहा फुटाचा हा रस्ता तीस फूट झाल्यास जवाहर रोड व बाजार पेठ यावरील बराचसा ताण कमी होईल असे बोलले जाते.
अभिष्टचिंतन कार्यक्रमात उपगराध्यक्षा श्रीमती रेखा मांगले यांच्यासह मुख्यधिकारी वाळुंज नगरसेवक दत्तात्रय मंडलिक,सुहास खराडे,सत्यजित पाटील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------------------

