कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखली मध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात दि. १५ जून रोजी उत्साहपूर्ण वातावरणात झाली. नानीबाई चिखली येथील कुमार व कन्या विद्यामंदिर मध्ये इयत्ता पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करण्यात आले.
यावेळी नानीबाई चिखलीच्या जिल्हा परिषद सदस्या शिवानी विजयसिंह भोसले तसेच पंचायत समिती सदस्या सुवर्णा जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्प, फुगे देऊन जीप मधून स्वागत करण्यात आले. नव्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आत्मीयता निर्माण व्हावी आणि त्यांचा पहिला दिवस आनंददायी ठरावा यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत नियमित शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
दरम्यान, चिखली इंग्लिश स्कूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर, खडकेवाडा केंद्र शाळा, गलगले तसेच लिंगनूर कापशी विद्यामंदिर येथेही इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळा परिसर फुगे, सजावट आणि स्वागत फलकांनी सजविण्यात आला होता. नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांचा उत्साह यामुळे सर्वत्र आनंदमय वातावरण निर्माण झाले होते.
नानीबाई चिखली येथील कुमार व कन्या विद्यामंदिरमध्ये नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या शिवानी विजयसिंह भोसले विद्यार्थ्यांसमवेत.
----------------------


