एमजे लकी इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

Kolhapur news
By -

 

      



                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


 एमजे लकी इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व वृक्षारोपण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांना खाऊ वाटप करण्यात आले.


शाळेचे चेअरमन जावेद मकानदार यांनी शाळा परिसरात ५०० हून अधिक वृक्ष लागवडीचा संकल्प जाहीर केला. कार्यक्रमात इस्रो भेटीसाठी निवड झालेल्या आराध्य प्रदीप सोरप व पृथ्वीराज रणजीत जठार तसेच दहावीत उल्लेखनीय यश मिळविलेल्या संस्कृती भोसले व प्रणोती तेली यांचा सत्कार करण्यात आला. मुरगूड नगरपालिकेत ३५ वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या कॉम्रेड बबन बारदेस्कर यांचाही सन्मान करण्यात आला.


यावेळी शाळा आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली होती. संस्थेचे प्रमुख बाबासाहेब मकानदार, वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी, पत्रकार व्ही. आर. भोसले, सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, समीर कटके, मुख्याध्यापिका जस्मिन जमादार, यांच्यासह  ट्रीझा बारदेसकर, शिक्षक, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.




                ---------------------