कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पाठीमागे शिवछत्रपतींचे आश्वारूढ स्मारक आणि पुढे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अजरामर इतिहास अशा स्फूर्तीदायक वातावरणात सौ. सोनल भुते या महिला वक्त्यांनी शंभु गाथा या विषयावर ओजस्वी व्यख्यान सादर केले.तेही हिंदीत.राजा असूनही महाराजांनी धर्मासाठी केलेले बलिदान जसे डोळ्यातून पाणी आणणारे होते तसे अंगावर रोमांच उभे करणारे होते.छत्रपती राजे वयाच्या नवव्या वर्षांपासून लढत होते. पाचशेच्या वर लढाया त्यांनी जिंकल्या. पण वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी स्वकीयांच्याच फंद फितुरीमुळे आयुष्याची लढाई हरले. औरंगाजेबाने धर्म परिवर्तनसाठी त्यांचे हाल हाल केले. डोळे काढले, कातडी सोलली पण राजे दृढ निश्चयी राहिले.
"राजन हो तुम सांचे
खुब लडे तुम जंग
तुव तप तेज निहार के
तखत त्यजत औरंग."
कवी कुलेशांच्या या काव्य पंक्ती सुद्धा अजरामर झाल्या,राजांचे अपराजित शौर्य आणि बलिदान पाहून औरंगजेब तख्त उतरून खाली आला होता.एका महिलेच्या हिंदी व्यख्यांनाने मुरगूडच्या शिवतीर्थावरील श्रोते अक्षरश: भारावून गेले होते.महिनाभर बलिदान मास पाळणाऱ्या सर्व शिव शंभु प्रेमीना आपल्या साधनेचे सार्थक झाल्याचे वाटले.
या कार्यक्रमास स्मिता शारबीदे,वर्षा पाटील, जयश्री चव्हाण, श्रद्धा वागणेकर, या आयोजक महिलांसह शिवतीर्थ परिवाराचे सर्व सदस्य अनेक युवक युवती उपस्थित होते.
सूत्र संचालन धीरज गोधडे यांनी केले.स्वागत पृथ्वीराज भुते यांनी केले, प्रास्ताविक प्रसाद गोंधळी यांनी केले.प्रमुख उपस्थितांमध्ये पत्रकार राजू चव्हाण, प्रवीण सुर्यवंशी, अतुल आमते, सूर्यवंशी सर,दिग्विजय कळंद्रे, लाडुवाले चव्हाण मामा, ओंकार परीट, संजय मोरबाळे,करणं कुंभार इत्यादी मान्यवर होते.
---------------------------


