एका वयोवृद्ध वडिलांच्या डोळ्यातील आसवांनी राज्याच्या मंत्र्यांचे पाय थांबवले !

Kolhapur news
By -

 

            


       कोल्हापूर न्यूज नेटवर्क   

   

  एका वयोवृद्ध वडिलांच्या डोळ्यातील आसवांनी राज्याच्या मंत्र्यांचे पाय थांबवले! ही गोष्ट आहे माणुसकीची आणि तत्पर प्रशासनाची. 


कोल्हापूर दौऱ्यावर असताना रुकडी फाट्यावर नायकू गवाणे या वृद्ध पित्याने मंत्री प्रताप सरनाईक यांचा ताफा थांबवला.आपला मुलगा अमोल गवाणे एसटीमध्ये ड्रायव्हर असून सध्या सिंधुदुर्ग विभागात कार्यरत असून उतारवयात त्याला कोल्हापुरात बदली मिळावी, ही कळकळीची विनंती त्यांनी करताच मंत्री प्रताप सरनाईक यांनी भर उन्हात उभे राहून ही व्यथा ऐकली आणि जागेवरच एसटी महामंडळाच्या  मॅनेजिंग डायरेक्टर ला फोन करून तात्काळ बदलीचे निर्देश दिले.


 विशेष म्हणजे, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बदलीचा आदेश देखील निघाला. यापूर्वी खासदार धैर्यशील माने यांनीही या बदलीसाठी पाठपुरावा केला होता.प्रशासनाच्या तत्पर आणि भावनिक निर्णयामुळे एका कुटुंबाचा आधार परतला आहे. 


      ----------------------------------